मूळ लेखन: सॅडी-मायकेला हॅरिस – मूळ लेख
अनुवाद: अभिषेक देशपांडे
नमस्कार, मी सॅडी, WordPress फोटोज टीममधील सदस्य आहे.
मी एक योगदानकर्ता आणि मॉडरेटर आहे आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही तुमचे स्वत:चे फोटो डायरेक्टरीमध्ये कसे सबमिट करू शकता. हे खूप सोपे आहे आणि हे एक खूप मैत्रीपूर्ण समुदाय ही आहे.
आजवर आपल्या कडे जगभरातून मोकळ्या मनाने १२,९४९ फोटो सबमिट केलेले आहेत.सुरुवात करण्यासाठी wordpress.org वर जा आणि कम्युनिटी (Community) आणि नंतर फोटो डायरेक्टरी (Photo Directory) पर्याय निवडा.
त्या नंतर, तुम्हाला हि स्क्रीन दिसेल. उजवी कडील वरच्या कोपऱ्यात, तुम्ही लॉग इन (Log In) करण्याचा किंवा नोंदणी (Register) करण्याचा पर्याय निवडाल.
wordpress.org साठी तुमचे स्वतःचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
जर तुमचे अजून खाते नसेल, तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण सोपे आहे.
एकदा लॉग इन केल्यानंतर, तुम्ही तुमचे स्वत:चे फोटो सामायिक करण्याची निवड करू शकता. ‘कॉन्ट्रिब्यूट’ (Contribute) लिंकवर क्लिक करा.
तुमचे स्वत:चे फोटो सबमिट करण्यापूर्वी, आम्ही विनंती करतो की, तुम्ही मार्गदर्शक सूचना (Guidelines) आणि FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न – वाचावे.
मार्गदर्शक सूचना तुम्हाला अशा प्रकारच्या फोटोंबद्दल खूप चांगली कल्पना देतील ज्या आम्हाला प्राप्त होऊ इच्छितात आणि तसेच जे आम्ही प्राप्त करू इच्छित नाहीत!
नेहमी विचारले जाणारे प्रश्न, फोटो डायरेक्टरीबद्दल थोडासा पार्श्वभूमीची माहिती देतात.
तुमचा पहिला फोटो अपलोड करण्यासाठी, तुमच्या संगणकावरून, हार्ड ड्राइव्हवरून किंवा मोबाइल फोनवरून ‘फाइल निवडा’ (Choose File) बटण वापरून एक फोटो निवडा.
त्यानंतर एक पर्यायी टेक्स्ट (Alternative Text) – फोटो चे वर्णनं लिहा
पर्यायी टेक्स्ट हा जितका वर्णनात्मक असेल तितके चांगले, कारण हा दृष्टीहीनांच्या फायद्यासाठी आहे.
त्या नंतर, तुम्हाला परवानगी आणि वापरासंबंधी सर्व पर्यायांची पुष्टी करण्यासाठी सर्व बॉक्स चेक करावे लागतील. असे करून तुम्ही सबमिट बटण दाबण्यापूर्वी यादीतील प्रत्येक मुद्द्याला तुमची स्पष्ट सहमती देत आहात. हे महत्त्वाचे आहे!
तुमचा फोटो अपलोड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, हे तुमच्या कनेक्शनच्या गतीवर अवलंबून असते, सामान्यतः जास्त वेळ लागत नाही.
तुमचा फोटो सबमिट झाल्यानंतर, तुम्हाला सबमिशन स्क्रीनवर नेले जाईल. तुम्ही तुमच्या प्रतीक्षेत असलेले फोटो मॉडरेशनसाठी कतारेत पाहू शकता. तुम्ही इथे पाहू शकता की सध्या माझ्याकडे मॉडरेशनसाठी तीन फोटो प्रतीक्षेत आहेत. एकाच वेळी मॉडरेशनसाठी जास्तीत जास्त पाच फोटो प्रतीक्षेत असू शकतात.
तुमचा फोटो मॉडरेट केल्यानंतर, तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केले जाईल की तो स्वीकारला गेला आहे की नाही. कृपया नाकारण्याची शक्यता कमी करण्यासाठी सबमिशन मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्याची खात्री करा.
तुमचे फोटो डायरेक्टरीमध्ये स्वीकारले गेल्यावर, तुमचे स्वतःचे फोटोग्राफ पाहण्यासाठी तुम्हाला एक संग्रहण लिंक मिळेल. ते गॅलरी फॉरमॅट मध्ये दिसतात. तुम्ही माझ्या फोटोस चे संग्रहण येथे बघू शकता.
आम्ही खूप उत्सुकतेने अधिक लोकांकडून त्यांचे फोटो WordPress फोटो डायरेक्टरीसाठी सामायिक करण्याची अपेक्षा करत आहोत आणि तुमच्याकडून लवकरच काही फोटोस प्राप्त होण्याची प्रतीक्षा करत आहोत.
Comments
One response to “फोटो डायरेक्टरीमध्ये फोटो कसे टाकायचे”
Happy to see my uploaded photo has been used for this page banner 😍
https://wordpress.org/photos/photo/68965a566b/